इंदापूर येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ

इंदापूर(प्रतिनिधी ) दि.१९: आशिया खंडातून पोलिओ जवळ जवळ पूर्ण संपला आहे अपवाद पाकिस्तान आहे. सरकारच्या पोलिओ मोहिमेमुळे भारतातून देखील पोलिओ पूर्ण नष्ट झाला आहे. वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने देखील भारताला पोलिओ मुक्त घोषित केले आहे. त्यानंतर पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने चालू ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दि. १९ रोजी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते पोलिस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिम इंदापूर तालुक्यात राबविण्यात आली. यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, उपसभापती संजय देहाडे, इंदापूर अर्बन बँकेच्या संचालिका अश्विनी ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ –
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे बालकास पल्स लसीकरण करताना पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा