गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा इंदापुरात संजय राऊत यांचा पुतळा जाळुन निषेध आंदोलन

इंदापुरात संजय राऊत यांचा पुतळा जाळुन निषेध आंदोलन

इंदापूर : खा.संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी आज इंदापुरमध्ये संजय राऊत यांचा पुतुळा जाळुन केला निषेध.
एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असे व्यक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आज इंदापुरात उमटले.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्या निषेधार्थ घोषणा देत प्रतिमा जाळली.

error: Content is protected !!
Exit mobile version