इंदापूरची कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे: स्वप्नील सावंत

13

इंदापूर, दि. २७ जुलै २०२०: इंदापूर शहरामध्ये झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता त्याची एक साखळी निर्माण झालेली आहे. ती तोडणे आता अवशक आहे व त्यासाठी प्रशासनाने व नगरपालिकेने योग्य ती उपाययोजना करावी असे मत इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.

इंदापूर शहरातील व तालुक्यातील कोरोनाचा प्रदुर्भा झपाट्याने वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस शहरात बेशिस्तीचे वातावरण वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी चहाचे गाडे, हॉटेल व चौक चौकात गपा मारत बसणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचा विसर लोकांना पडायला लागला आहे. सकाळची भाजी मंडई सहित बऱ्याच ठिकाणी सरकारच्या सूचनेचा पायमल्ली होताना दिसून येत आहे. तरी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन उपायजोजना कराव्यात असे ते म्हणाले.

सोमवारी सकाळी नगरपालिकेचे चिफ ऑफिसर यांची इंदापूर शहर अध्यक्ष तानाजी भोंग यांनी समक्ष भेट घेतली. शहरातील सध्याची परिस्थितीवर चर्चा केली व उपाय करण्याचे पत्र मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्याकडे देण्यात आले.

या वेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जकिर भाई काझी, तालुका उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे, शहर कार्याध्यक्ष चमन भाई बागवान, उपाध्यक्ष तुषार चिंचकर,भगवान पासगे, सुरेश लोखंडे, सिफियान जमादार आदी उपस्तिथ होते. याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व तहसीलदार सोनाली मेटकरी यांना पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे