माढा तालुक्यातील रांजणी येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण

माढा (सोलापूर), दि. २३ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी या गावी सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य दादा चंदू माने यानी हे उपोषण सुरू केले आहे.

रांझणी गावातील घरकुल लाभार्थी गेली वीस वर्षे ज्या जागेवर राहतात त्यांना त्या जागा देण्यात याव्यात, तहसीलदार माढा यांनी गावठाण हद्दीतील प्लॉट धारक यांची प्लॉटची रक्कम भरलेल्या लोकांची ७/१२ वर नोंद लावण्यात यावी, गायरान गट नंबर ३१/१ मध्येजागा शिल्लक नसल्याने गावातील ३५० लोकांची अतिक्रमणे कायम करावीत, उजनी डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असल्याने रांझणी येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती.

त्या जमिनीवरील ७/१२ सदरी असणारी नावे कमी झाली होती ती पुन्हा नावे लावण्यात यावीत या आणि अशा अनेक मागण्यांसाठी रांझणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य दादा चंदू माने यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मंडळाधिकारी सौ कोरबू यांनी शासनाच्या वतीने उपोषणस्थळी देऊन देखील ठोस आश्‍वासन न मिळाल्याने हे उपोषण दोन दिवस झाले सुरूच आहे. यावेळी ग्रामसेवक एल एम शेख, आर एस चव्हाण, खुळे भाऊसाहेेब, पोलीस पाटील, साहेबराव जाधव, सरपंच अदिका जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन प्रश्‍न मार्गी लावावेत अशी मागणी केली अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा