नवी दिल्ली, २७ ऑगस्ट, २०२२ : युक्रेन आणि रशियाचं युद्ध गेले सहा महिने चालू आहे. पण यात इतके दिवस भारत मात्र अपक्षाच्या भूमिकेत होता. आता मात्र भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात भारताने रशियाविरुद्ध मतदान केले आहे. त्यामुळे भारत आता रशियाविरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनेक दिवस भारत कुठल्याच देशाच्या बाजूने भूमिका घेत नव्हता. त्यातही भारत हा UNSC चा सदस्य असून त्याचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे. तो कालावधी आता डिसेंबरपर्यंत असून आता हा कालावधी संपायच्या आत भारताने भूमिका घेतली असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
भारत आणि रशिया यांच्यात तेलविक्रीचा करार झाला असून या करारामुळे अमिरेका भारतावर नाराज आहे. तर युक्रेनही या करारामुळे भारतावर नाखूश आहे. तरीही भारताला तेल देणाऱ्या देशांमध्ये इराकचा नंबर आधी लागतो. पण त्यामुळे रशियादेखील नाराज असल्याचं जाणवतं आहे. पण या सगळ्यामध्ये देशाच्या हिताचे जे असेल ते आम्ही करु असं म्हणत, भारताने रशियाबरोबर तेलविक्रीचा करार केला.
युक्रेनच्या ३१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच सगळ्या देशांची सुरक्षा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर सगळ्या राष्ट्रांनी मतदान केले. त्यावेळी पहिल्यांदाच भारताने रशियाविरुद्ध मतदान केले. त्यामुळे आता रशियाविरोधी राष्ट्रात भर पडली आहे. त्यात भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राने हे पाऊल उचलल्याने आता रशियाची चिंता वाढू शकते. त्यामुळे या सर्व लढ्यात भारताने आता उडी घेतली आहे, हे वास्तव आहे. तेव्हा पुढे भारत काय करणार, याची रशियाने चिंता करावी, हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस