भारत-अमिराती मध्ये अनेक सामंजस्य करार, आता स्थानिक चलनांद्वारे व्यवहार करता येणार

नवी दिल्ली, १६ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा फ्रान्सचा दौरा झाल्यानंतर शनिवारी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युएईचे राष्ट्रपती शेख बिन जायद यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत दोन्ही देशांची द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामध्ये, अनेक सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती भारत आणि युएईच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. IIT दिल्लीचे कॅम्पस मध्ये तसेच अबुधाबीमध्ये भारतीय स्थानिक चलनांद्वारे व्यवहार होणार आहेत.

या करारानुसार भारतीय चलन आता दुबई मध्ये तर युएईच चलन भारतात वापरता येणार आहे. डॉलरऐवजी आपल्या स्थानिक चलनांत व्यापारविनिमय करणे आणि जलद व्यवहार यंत्रणांची फास्ट पेमेंट सिस्टीम जोडणी, याबाबत शनिवारी भारत आणि संयुक्त अरब अमिराती(यूएई)मध्ये द्विपक्षीय करार करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दोन्ही देशांतील व्यापार सध्या ८५ अब्ज डॉलर असून तो लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.

तसेच गेल्यावर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएईमधील व्यापारात २० टक्क्यांनी वाढ झालीय. उभय देशांच्या चलनांमध्ये व्यापार विनिमय करण्यासाठी शनिवारी झालेल्या करारामुळे दोन्ही देशांतील भक्कम आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास याची प्रचीती येणार असल्याचं मोदी यांनी म्हंटले आहे.

दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार फास्ट पेमेंट सिस्टीम नुसार आता भारताची ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’(यूपीआय) यूएईच्या ‘इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी)’शी जोडण्यात येईल. त्याचबरोबर आयआयटी, दिल्लीचे कॅम्पस अबुधाबी येथे सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली.

भारत- यूएईतील व्यापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि यूएईचे दिऱ्हम या चलनांचा वापर करता यावा म्हणून, एक रचना तयार करण्याबाबत दोन्ही देशांत सामंजस्य करार करण्यात आला आहे. द्विपक्षीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक चलन व्यवहार यंत्रणा (एलसीएसएस) विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अबूधाबीच्या शिक्षण मंत्रालयाने, शनिवारी आयआयटी दिल्लीचे कॅम्पस अबूधाबीत स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली, ही IIT मद्रास नंतर बाहेरील देशात IIT चा कॅम्पस स्थापन करणारी दुसरी संस्था आहे. आयआयटी मद्रासने टांझानियाच्या झांझिबारमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा