भारत-ऑस्ट्रेलिया मैत्री ‘३D’ वर आधारित ; ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले

ऑस्ट्रेलिया, २३ मे २०२३: भारत-ऑस्ट्रेलियाची मैत्री ‘लोकशाही दोस्ती आणि डायस्पोरा’ या ३ डी वर आधारित आहे. दोन्ही देशांचे संबंध ऐतिहासिक आहेत. हिंद महासागराने आपल्याला जोडले आहे. भारतात हजारो वर्षांची जिवंत संस्कृती आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलिया-भारतामधील ऐतिहासिक मैत्रीचे स्मरण केले.

पंतप्रधान मोदी दोन दिवस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. आज ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे त्यांनी २० हजार भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाची मैत्री कॉमनवेल्थ आणि क्रिकेटद्वारे ओळखली जात होती. नंतर दोन्ही देशांच्या मैत्रीची व्याख्या “लोकशाही डायस्पोरा आणि दोस्ती” अशी केली आहे: पण माझा विश्वास आहे की, भारत ऑस्ट्रेलियाचे नाते या पलीकडे आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम आहे. भाषा अनेक आहेत: पण आपण एक आहोत. भारत ऑस्ट्रेलियामध्ये परस्पर विश्वास आणि आदर केवळ राजनैतिक संबंधांमुळे विकसित झाला नाही, तर याचे कारण ऑस्ट्रेलियात राहणारे सर्व भारतीय आहेत. आज भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक उज्ज्वल स्थान मानतात. भारतातील बँकांच्या ताकदीचे सर्वत्र कौतुक होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा