कोरोना आणि अर्थव्यवस्थेबाबत पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मागे भारत? राहुल गांधीं

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२०: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे. पडणारी अर्थव्यवस्था आणि कोरोना संकटाबाबत राहुल यांनी केंद्र सरकारला घेराव घातला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर १० देशांचे डेटा शेअर केले आहेत, ज्यात अर्थव्यवस्था आणि कोरोनाबद्दल तथ्य दिले गेले आहे. यामध्ये भारताची स्थिती चिंताजनक आहे.

राहुल गांधींनी कोरोना आणि अर्थव्यवस्थेविषयी सामायिक केलेल्या आकडेवारीत भारत बांगलादेश आणि पाकिस्तान पेक्षाही मागे आहे. बांगलादेश पहिल्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीत भारत ११ व्या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार, भारताची जीडीपी ग्रोथ -२०२० वजा १०.३ आहे, तर कोरोनाच्या बाबतीत भारताची स्थिती चिंताजनक आहे.

त्याचबरोबर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचे ७५ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५५,७२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५७९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात कठोर हल्ला केला होता. अलीकडेच, त्यांच्या पंजाब दौर्‍याशी संबंधित व्हिडिओ ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, शेतकऱ्यांनी देशाला अन्न सुरक्षा दिली आणि मोदी सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली. पण आता हे अजून सहन केलं जाणार नाही.

या महिन्यात राहुल गांधींनी ‘खेती बचाओ यात्रा’ च्या माध्यमातून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तीन दिवसांच्या दौऱ्या दरम्यान राहुल गांधींनी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी, जाहीर सभांमध्ये राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. हरियाणाच्या पिहोवा येथे ते म्हणाले की, मोदी सरकार अंबानी आणि अदानीसाठी मार्ग मोकळे करण्यात गुंतलेले आहे. याचा शेतकऱ्यांच्या हिताशी कोणताही संबंध नाही.

बिहार मध्ये काढणार दोन रॅली

निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधी दोन मोर्चांना संबोधीत करतील. नवादा जिल्ह्यातील हिसुआ विधानसभा जागेवर पहिली रॅली होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (तेजस्वी यादव) नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भागलपूर विधानसभा मतदार संघात दुसरी रॅली होईल. याशिवाय दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी सभा घेण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा