दिल्ली, २९ जून २०२० : भारत आणि भूतानचे नातेसंबंध खरोखरच अनन्य असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले की दोन्ही देश एकत्रितपणे कोरोना वायरस विरूद्ध लढा देत आहेत, ते पुढे म्हणाले की, नवी दिल्ली या व्यवहारात भूतान बरोबर आहे. भूतान सध्या जागतिक समस्या व आव्हानांना तोंड देत आहे.
भूतानमधील खोलोंगछू येथील ६०० मेगावॅटच्या JV – हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पातील सवलतीच्या कराराच्या स्वाक्षरीच्या कार्यक्रमा प्रसंगी एस्. जयशंकर हे बोलत होते . भूतान सरकार आणि खोलोंगच्छू हायड्रो एनर्जी लिमिटेड यांच्यात हा करार झाला.
जयशंकर म्हणाले की, हा संयुक्त प्रकल्प दोन शेजारी देशांमधील “वैविध्यपूर्ण”आणि “बहुपक्षीय द्विपक्षीय सहकार्याते” मधील हा आणखी एक मैलाचा दगड आहे.
“६०० मेगावॅटचा खोलोंगछू जेव्ही-हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प भूतानमध्ये राबविण्यात येणारा पहिला संयुक्त उपक्रम आहे. मी भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (डीजीपीसी) आणि भारताच्या सतलुज जल विद्युत निगम लिमिटेड (एसजेव्हीएनएल) या दोघांनाचे या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो आणि आशा करतो की ते उत्तम काम करतील. प्रकल्प पूर्ण करण्यात कसलीही कसर सोडू नका, ”असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात मंत्रीमहोदय म्हणाले.
पूर्व-भूतानमधील त्राशियांगत्से जिल्ह्यातील खोलोंगछू नदीच्या खालच्या किना-यावर ६०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे आणि तो २०२५ च्या उत्तरार्धात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूतानचे परराष्ट्रमंत्री ल्योन्पो तांडी दोरजी, भूतानचे आर्थिक व्यवहार मंत्री लियोन्पो लोकनाथ शर्मा आणि भारत आणि भूतानच्या परराष्ट्र सचिवांसह वरिष्ठ सरकारी अधिकारीही या कार्यक्रमास सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जयशंकर यांनी आशा व्यक्त केली की जेव्हा दोन्ही देश कॉविड १९ सारख्या साथीच्या आजाराशी लढा देत आहेत त्यावेळेस या प्रकल्पातील बांधकाम उपक्रम सुरू झाल्याने भूतानमध्ये या कठीण परिस्थितीत आर्थिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल .
न्यूज अनकट प्रतिनिधी