लडाख, दि. १५ जुलै २०२० : काल भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्करातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा तब्बल चौदा तास सुरू होती. सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ही चर्चा रात्री २ वाजता संपली. या चर्चेदरम्यान विवादित क्षेत्रापासून चिनी सैन्य मागे हटल्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या चिनी सैन्य पेंगोंग क्षेत्राच्या फिंगर -५ वर उभे आहे. एप्रिलपूर्वी परिस्थिती पूर्ववत करावी अशी मागणी भारतीय लष्कराने केली आहे.
भारत आणि चीनच्या कमांडर्सची ही चौथी बैठक होती. दोन्ही सैन्याने त्यांच्या जुन्या जागी म्हणजेच पूर्वीच्या ठिकाणी तैनात असलेल्या जागी जावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एप्रिलमध्ये दोन्ही सैन्य ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी परत आले आहेत, दोन्ही सैन्याने त्यांची मोठी शस्त्रे मागे घेतली आहेत. कोर कमांडरच्या बैठकीपूर्वीच चिनी सैन्य पीएलए फिंगर फोरमधून फिंगर फाइवर परतले आहे.
सध्या चिनी सैन्य फिंगर -५ वर उभे आहे. भारताने त्याला फिंगर -८ पर्यंत परत जाण्यास सांगितले आहे. वास्तविक भारतीय फौजही फिंगर -८ पर्यंत पेट्रोलिंग करत आहे, परंतु एप्रिलनंतर चिनी सैन्याने आपली जमवाजमव फिंगर -४ वरून फिंगर -८ पर्यंत वाढविली आणि भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखले.
भारतीय सैन्याने पीपल्स लिबरेशन आर्मीला स्पष्टपणे सांगितले आहे की फिंगर ८ वरून चिनी सैन्य मागे होऊन एप्रिल महिन्याच्या पूर्व ठिकाणी स्थित व्हावे. या क्षणी, चिनी सैन्याने फिंगर -४ ते फिंगर -५ पर्यंत माघार घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फिंगर -४ हा नो-पेट्रोलिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, म्हणजे दोन्ही देशांचे सैन्य फिंगर -४ मध्ये पेट्रोलिंग करणार नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी