भारताने पार केला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा, 24 तासांत 18,454 नवीन रुग्णांची नोंद

23
नवी दिल्ली, 22 ऑक्टोंबर 2021: देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावत काल  कोविड -19 लसींच्या  100 कोटी  मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण  टप्पा ओलांडला आहे.  आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि हा  विस्मयकारक पराक्रम गाजविल्याबद्दल  देशातील वैज्ञानिक समुदाय आणि आरोग्य व्यावसायिकांप्रती  कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांनीही देशाने  हे यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17,561 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून)ही  3,34,95,808  इतकी झाली आहे. परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा  दर सध्या 98.15% आहे.  हा दर सध्या मार्च 2020 नंतरच्या उच्चांकी स्तरावर आहे.
केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 116 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन प्रकरणांचा नोंदवल्या जाणाचा  कल कायम आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 18,454 नवीन रूग्णांची नोंद झाली. सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,78,831 आहे.  सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण  रुग्णांच्या 0.52% आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्यांच्या  क्षमतेत सतत वाढ होत आहे.  गेल्या २४ तासांत एकूण 12,47,506 चाचण्या केल्या गेल्या.  भारताने आतापर्यंत एकूण 59.57 कोटी (59,57,42,218) चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढत  असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.34% वर असून गेल्या 118 दिवसांपासून 3% पेक्षा कमी राहिला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.48%  इतका नोंदवला  गेला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 52 दिवसांपासून 3% च्या खाली आणि आता सलग 135 दिवस 5% च्या खाली राहिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा