भारताकडून अफगाणिस्तानला १०,००० मेट्रिक टन गव्हाची मदत

7

अफगाणिस्तान, ५ जुलै २०२३: भारताकडून अफगाणिस्तानला १०,००० मेट्रिक टन गहू देऊन मदत केल्याची माहिती, युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्रामकडून देण्यात आलीय. अफगाणिस्तान सध्या तीव्र अन्न संकटाशी झुंजत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने ही मदत केली. मंगळवारी १०,००० मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानच्या हेरात शहरात पोहोचला.

गेल्या महिन्यात भारत सरकारने, देशातील मानवतावादी संकटा दरम्यान इराणच्या चाबहार बंदराचा वापर करून २०,००० मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवला होता. अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मदत वितरणाच्या माध्यामांचा विस्तार करून अफगाणिस्तानच्या स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आपले समर्पण दाखवत आहे.

तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानला सर्वांत वाईट मानवतावादी संकटांचा सामना करावा लागत आहे. देशातील महिलांना मूलभूत अधिकार नाकारण्यात आले आहेत. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या मूल्यांकनानुसार, अफगाणिस्तान हा अत्यंत अन्न असुरक्षितता असलेल्या देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक संकटे आणि उपासमारीने ग्रस्त आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा