भारतातील पहिला ‘डॉल्बी सिनेमा’ पुण्यात

India’s First Dolby Cinema Launched in Pune
पहिला 'डॉल्बी सिनेमा' पुण्यात;

India’s First Dolby Cinema Launched in Pune: भारतातील पहिला ‘डॉल्बी सिनेमा’ तंत्रज्ञान पुण्यात येत असून खराडीतील ‘सिटी प्राइड’मध्ये सर्वोत्तम दृकश्राव्यचा अनुभव देणाऱ्या ‘डॉल्बी सिनेमा’ या तंत्रज्ञानाचा आविष्कार आता पुण्यात अनुभवता येणार आहे. खराडी येथील ‘सिटी प्राइड’मध्ये ‘डॉल्बी सिनेमा’ असणारे एक चित्रपटगृह सुरू झाले . या तंत्रज्ञानाचा अनुभव देणारे हे संपूर्ण भारतातील पहिलेच चित्रपटगृह ठरले आहे.

या चित्रपटगृहाची रचना;
या चित्रपटगृहाची रचना अनोखी असून आतील बाजू संपूर्णपणे काळ्या रंगात असून ध्वनिक्षेपक प्रेक्षकांना दिसणार नाहीत अशा पद्धतीने लावण्यात आले आहेत. येथील पडदाही ‘वक्राकार’ असून उजव्या भिंतीपासून डाव्या भिंतीपर्यंत आणि जमिनीपासून छतापर्यंत उंचीचा हा भव्य पडदा आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले चित्रपटगृह ३१० आसन क्षमतेचे आहे.’डॉल्बी सिनेमा’चा अनुभव देण्यासाठी खास त्या पद्धतीने हे चित्रपटगृह तयार करण्यात आले आहे.

सिटी प्राइड’चे भागीदार पुष्कराज चाफळकर काय म्हणालेत;

याबाबत ‘सिटी प्राइड’चे भागीदार पुष्कराज चाफळकर म्हणालेत कि , “हे इतर अनेक देशांमध्ये होते. त्याचा अनुभव आम्ही दुबईला जाऊन घेतला; त्यावेळी हे आणण्याचा निश्चय केला.ओटीटी व्यासपीठांमुळे चित्रपटांसमोरील आव्हाने वाढत असताना लोकांना चित्रपटगृहात येण्यासाठी नवीन उत्साहवर्धक कारण दिले पाहिजे, असाही विचार होता. त्यातून हे शक्य झाले.” चित्रपट येथे आता पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूडमधील बहुतांश चित्रपट या पद्धतीचे असून भारतातील काही चित्रपटही या तंत्रज्ञानानुसार तयार होणार आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने तिकिटांची किंमत काहीशी अधिक असणार आहे.

‘डॉल्बी ॲटमॉस’ मुळे चित्रपट पाहताना काय वेगळेपण असतं;
डॉल्बी या कंपनीने चित्रपटाचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान एकत्र करून ‘डॉल्बी व्हीजन आणि ‘डॉल्बी ॲटमॉस’ अशा दोन सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ‘डॉल्बी व्हिजन’मुळे चित्रपटाच्या दृश्यातील रंग अधिक प्रखर आणि स्पष्ट दिसतात; तर ‘डॉल्बी ॲटमॉस ‘ मुळे त्रिमितीय ध्वनी अनुभव मिळतो. यात प्रत्येक दिशेला ध्वनिक्षेपक असल्याने दृश्यात अपेक्षित बाजूने प्रेक्षकांना आवाज ऐकू येतो. या दोन्ही तंत्रज्ञानांच्या संगमाने प्रेक्षकांना प्रत्यक्ष चित्रपटांमधील प्रसंगांमध्ये उभे असल्याचा अनुभव येतो आणि दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला चित्रपट जसाच्या तसा सादर होतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर