पुणे, १० मार्च २०२१ : भारत इग्लंड कसोटी सिरीज नुकतीच पार पडली ज्यामधे भारताने दमदार कामगिरी करत या सिरीजवर ३-१ ने कब्जा केला.मोठ्या रोमहर्षक पद्धतीने झालेल्या या कसोटी सामन्यात बरेच उतार-चढ पहायला मिळाले.एकीकडे हा सामना रंगत होता तर दुसरीकडे अनेक दिग्गज हे खेळाच्या मैदानात पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी उतरले आहेत.
बरोबर ओळखलत भारत इंग्लंड कसोटी पाठोपाठ “रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज” सुरू झाली.ज्यामधे अनेक रिटायर लिजेंड्स खेळाडू मैदानात क्रिकेट खेळत आहेत.आगदी सचिन तेंडुलकर पासून ते ब्रायन लारा पर्यंतचे क्रिकेटर या सिरीज मधे सहभागी झाले आहेत.जिथे पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स विरुद्ध श्रीलंका लिजेंड्स उतरले होते.जिथे भारताचा विजय झाला होता.
इंडिया लिजेंड्स ने विजयाने आपली सुरवात केली.सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग आपल्या जुन्याच शैलीत ओपनिंग करत एक तरफा मॅच जिंकून दिली.मात्र काल झालेल्या इंडिया लिजेंड्स विरुद्ध इंग्लंड लिजेंड्स सामन्यात भारताला परभवाला सामोरे जावे लागले.
निवृत खेळाडूंच्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मधे इंग्लंड लिजेंड्स नी भारत लिजेंड्स चा ६ धावांनी पराभव केला.इंडियाने टाॅस जिंकून पहिल्यांदा बाॅलिंग घेतली.ज्यामधे इंग्लंड ने २० ओव्हर मधे ७ बाद १८८ धावा केल्या.इंग्लंड कडून केव्हीन पीटरसन ने ३७ बाॅल मधे ६ फाॅर आणि आणि ५ सिक्स च्या मदतीने ७५ रन्स केले.
तर याच प्रत्युत्तरात इंडियाने २० ओव्हर मधे ७ बाद १८२ धावापर्यंत मजल मारु शकला.इंडियाकडून इरफान पठाण ने सर्वाधिक धावा ठोकल्या.ज्या मधे ४ फाॅर आणि ५ सिक्स च्या मदतीने त्याने ६१ रन्स केले होते.काहीही झाले तरी क्रिकेटप्रेमीसांठी सामन्यांची मेजवानीच मिळाली आहे.भारत इंग्लंड कसोटी सामन्यानंतर आता रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज पहायला मिळत आहेत.तर पुढच्या महिन्यात पुन्हा आयपीएलचा थरार सुरू होणार आसून त्याचा आनंद लुटायला मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.