भारत की श्रीलंका, कोण ठरणार महिला आशिया कप २०२२ चा विजेता?

पुणे, १५ ऑक्टोबर २०२२ : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेच्या विरुद्ध सामना होणार आहे. भारताने सहापैकी पाच साखळी सामने जिंकताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली, गुरुवारी पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने थायलंडचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा एक धावांनी पराभव केला.

दरम्यान आज भारतीय संघाचे तब्बल सातव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्याचे लक्ष असेल. भारताने या अगोदर २००४, २००५,२००६, २००८,२०१२ ,२०१६ मध्ये विजेतेपद पटकावलेला होता. त्यानंतर २०१८ मध्ये विजेतेपद पटकावलेला आहे. त्याचबरोबर श्रीलंकाही पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांनी तब्बल १४ वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

यंदाच्या आशिया चषकात कर्णधार हरमनप्रीतला दुखापती मुळे काही सामन्यांना मुकावे लागले, यामुळे आपल्या नवीन खेळाडूंना आजमावण्याची संधी भारताला मिळाली यामुळे भारतीय संधी किती मजबू स्थितीत आहे हे समजल. त्याचबरोबर भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंनी आशिया चषक स्पर्धेत फारसं योगदान दिले नाही, तरीही भारतीय महिला संघाने सहज गत्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने भारतीय संघाची ताकदही यातून दिसून आली आहे. दरम्यान आजचा सामना दुपारी १ वाजता खेळवला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा