पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द, पाकिस्तानचा सुपर-४ मध्ये प्रवेश

पल्लेकेले, श्रीलंका ३ सप्टेंबर २०२३ : आशिया कप २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये समान गुणांची वाटणी झाली. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात होता.

भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, जेथे पाकिस्तानी वेगवान गोलंदाज आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी मिळून भारताच्या आघाडीच्या फळीला १४.१ षटकात ६६ धावांवर बाद केले. इशान आणि हार्दिक, जे सहसा मोठे फटके खेळतात त्यांना पाकिस्तानच्या झंझावाती वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी संयमाने खेळावे लागले. विकेट सुरक्षित राहावी म्हणून त्यांला शॉट्स निवडताना काळजी घ्यावी लागली.

इशानने ८१ चेंडूत ८२ तर पांड्याने ९० चेंडूत ८७ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४१ चेंडूत १३८ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत धावसंख्या मिळवून दिली. आफ्रिदीने ३५ धावांत चार तर रौफने ५८ धावांत तीन विकेट्स घेतले. नसीम शाहलाही तीन विकेट्स मिळाले. मोठे फटके खेळणे सोपे नव्हते, त्यामुळे पंड्या आणि किशनने सावकाशपणे डाव पुढे नेला.

भारताने पाकिस्तानला २६६ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, त्यानंतर पावसामुळे एकही षटक खेळता आले नाही. मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी खेळ सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि दोघांमध्ये १-१ गुण सामायिक दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा