८ वर्षानंतर भारत-पाकिस्तान सामना, टीम इंडियाने १९ मिनिटांत खेळ संपवून जिंकले विजेतेपद

नवी दिल्ली, २ जून २०२३: भारताच्या ज्युनियर संघाने पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत भारताने चौथ्यांदा ज्युनियर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. तब्बल ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही स्पर्धा झाली. म्हणजेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्बल ८ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान संघ भिडले होते. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.

भारताकडून अंगद बीर सिंगने १२व्या मिनिटाला आणि अरिजित सिंगने १९व्या मिनिटाला गोल केले. भारताचे माजी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांनी प्रशिक्षित केलेल्या पाकिस्तानी संघासाठी बशारत अलीने ३७ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. यापूर्वी भारताने २००४, २००५ आणि २०१५ मध्ये विजेतेपद पटकावले होते, तर पाकिस्तानने १९८७, १९९२ आणि १९९६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. इतकंच नाही तर याआधी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळा भिडले होते. १९९६ मध्ये पाकिस्तान आणि २००४ मध्ये भारत जिंकला होता. शेवटच्या वेळी म्हणजे २०१५ मध्ये भारताने अंतिम फेरीत ६-२ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.

पहिल्या तिमाहीत भारताने पाकिस्तानवर दबाव आणला होता. हाफ टाईमपर्यंत भारताने २-० अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. हाफ टाईमपूर्वी पाकिस्तानला खाते उघडण्याची संधी असली तरी भारताचा गोलरक्षक मोहित एच.एस. शाहिद अब्दुलच्या प्रयत्नावर त्यांनी पाणी फेरले. तिसऱ्या क्वार्टरच्या ७व्या मिनिटाला पाकिस्तानने आपले खाते उघडले.

भारताने पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. ५० व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण संधीचे सोने करता आले नाही. ४ मिनिटांनंतर, त्यांला आणखी २ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारताने त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी केले. यापूर्वी, हॉकी ज्युनियर आशिया चषक २०२३ च्या साखळी टप्प्यातही दोन्ही संघ भिडले होते , जिथे सामना १-१ असा बरोबरीत संपला होता. साखळी टप्प्यात दोन्ही संघांनी एकही सामना गमावला नव्हता. उत्कृष्ट गोल सरासरीच्या जोरावर भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल ठरला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा