India vs Pakistan match after terror attack: ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा भारत- पाकिस्तान सामन्यावर बंदीची मागणी ओसंडून वाहत होती. आता पहलगाम हल्यानंतर पुन्हा एकदा अशीच मागणी होऊ लागली आहे.पुलवामा हल्ल्यानंतर अशी मागणी झाली होती खरी,परंतु त्याच्याच पुढच्या 2-3 वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये व आशिया चषक स्पर्धेत India vs Pakistan आमने-सामने येऊन त्यांच्यात लढत झाली. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे आता BCCI यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचबरोबर आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात नको, अशी मागणी करणारे पत्र बीसीसीआयने आयसीसीला दिल्याच्या अफवाही पसरू लागल्या आहेत.
सरकार कडून जे आदेश येतील त्याचे आम्ही पालन करू अशी भूमिका BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केली आहे. भारतीय निमायक क्रिकेट बोर्ड याचा गांभीर्याने विचार करेल असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी क्रिक बझला माहिती देतना सांगितले.पण,आयसीसीला कोणत्याही प्रकारचे पत्र पाठवले नसल्याचेही त्यांनी सांगितले. ICC च्या आता लगेच कोणत्याही स्पर्धा नाहीयेत. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये भारतात महिला क्रिकेट संघाचा वनडे वर्ल्डकप होणार आसून त्यामध्ये 8 संघाचा समावेश असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर