पुणे, २३ ऑक्टोबर २०२२ : आज आशिया चषका नंतर टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत. या मॅच साठी दोन्ही टीम्स जोरदार तयारी करत असून विजय मिळवण्याच्या इराद्यांनी दोन्ही टीम्स मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजची तिसरी मॅच असणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचा लक्ष लागून आहे. तर भारत आणि पाकिस्तान मधील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या आजच्या सामन्यात पाऊस पडणार असल्याची जोरदार शक्यता आहे. हवामान खात्याकडून आज मेलबर्न येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान पाकिस्तानी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया चार टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. पण त्यातला एकही सामना जिंकता आलेला नाही. तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर भारत पाक हे दोन्ही संघ टी-२० वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत सहा वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवलाय तर पाकिस्तानला एकच सामना जिंकता आला आहे.
आजचा सामना ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न मध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता खेळला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव