पुणे, २१ ऑगस्ट २०२३: आशिया कप २०२३ या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे होणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशपाठोपाठ नेपाळनेही आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे.
आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपला संघ जाहीर करणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. आशिया कपमध्ये दोन भारतीय खेळाडूंची एंट्री होऊ शकते. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू दुखापतीनंतर थेट आशिया कप खेळताना दिसतील.
यावेळी आशिया कप हा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवला जाणार आहे. आशिया चषकाचे यजमान पाकिस्तानचे फक्त ४ सामने होणार आहेत, तर फायनलसह उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेले केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये प्रवेश करू शकतात. हे दोन्ही खेळाडू आता बरे झाले आहेत.
भारताचा १७ सदस्यीय संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड