मुंबई २१ फेब्रुवरी २०२१: मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी भारतीय संघाची बीसीसीआयने ट्वीट करत घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा ही विराट कोहलीकडे खांद्यावर असणार आहे.
या सीरीजसाठी IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या
तिघांना संधी दिली आहे.
मालिकेसाठी टीम इंडिया:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल
राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक
पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक),
युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर,
राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहार,
नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
टी20 मालिका वेळापत्रक
12 मार्च – पहिली टी20
14 मार्च – दुसरी टी20
16 मार्च -तिसरी टी20
18 मार्च – चौथी टी20
20 मार्च – पाचवी टी 20
या सर्व टी 20 मालिका अहमदाबाद येथील मोटेरा
स्टेडियमवर वरील तारखांना सायंकाळी 7 वाजता आयोजित
केल्या आहेत.