भारत खरेदी करणार ७२,००० सिग ७१६ रायफल

नवी दिल्ली, दि. १३ जुलै २०२०: भारत आणि चीन मध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष चालू आहे विशेषत: लडाखमधील हिंसक चकमकीनंतर सीमेवरील तणाव आणखीन वाढला आहे. एकूण परिस्थिती पाहता भारताने वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपली तयारी बळकट करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत भारतीय लष्कराने ७२ हजार अमेरिकन असॉल्ट रायफल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सैन्याने आदेशही दिले आहेत. ही सर्व अत्याधुनिक शस्त्रे अमेरिकेतून खरेदी केली जातील.

मागणी केलेल्या या बंदुकांच्या पहिल्या खेपेेनंतर आता ही दुसऱ्या खेपेचे मागणी अमेरिकेकडे करण्यात आली आहे या आधी भारतीय लष्कराला ७२ हजार बंदूका मिळाल्या होत्या. ज्याचा उपयोग नॉर्दन कमांड आणि ऑपरेशनल एरियामध्ये केला जात आहे.
या रायफलची सर्वात खास गोष्ट म्हणजे तीची मारक क्षमता ५०० मीटर (अर्धा किलोमीटर) पर्यंत आहे. तसेच, या रायफलची गोळी इतर रायफल्स पेक्षा मोठी आहे, जी जास्त प्राणघातक आहे. या रायफलने लावलेला निशाणा एकदम अचूक असतो आणि एका गोळीतच क्षत्रूला ठार करण्याची क्षमता या रायफल मध्ये आहे. यामुळेच या रायफलला ‘शूट टू किल’ असे संबोधले जाते.

सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैन्याला मिळालेल्या शस्त्रास्त्रांच्या अर्थसंकल्पाच्या आधारे आणखी ७२ हजार अमेरिकन अ‍ॅसॉल्ट रायफल्सची ऑर्डर देण्यात येत असून यामुळे आपल्या सैन्य दलाची ताकद वाढेल.

यापूर्वी, भारतीय लष्कराकडून प्राप्त झालेल्या ७२,००० सिग ७१६ रायफलचा वापर बंडखोरीविरूद्ध कारवाईत केला जात आहे. यामुळे दहशतवादाविरूद्ध सुरक्षा दलांच्या लढ्याला बळकटी मिळाली आहे. यापूर्वी, फास्ट ट्रॅक प्रक्रियेअंतर्गत अमेरिकेकडून ७२,००० रायफल खरेदी करण्यासाठी भारताने ७०० कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा