सौदी अरेबिया कडून भारत तेलाची आयात करणार कमी

7

नवी दिल्ली, १९ मार्च २०२१: भारत मध्यपूर्व देशांकडून कच्च्या तेलाची मागणी कमी करणार आहे. ऑपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात कायम ठेवल्याने अमेरिकेतील कच्चे तेल भारतासाठी परवडण्याजोगे झाले आहे. सध्या भारत आपल्या कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी इतर देशांतील कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. भारत जगातील सर्वात जास्त तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे,

सध्या कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे जनता आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर जास्त करत आहेत. परिणामी इंधनाची खपत देखील वाढली आहे. देशातील तीन मोठ्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या इंधना मध्ये सल्फरचे प्रमाण कमी असते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इंडियन ओईल कॉर्परेशन सहित अन्य तेल कंपन्यांनी मे महिन्यात सौदी अरेबिया कडून तेल आयात कमी करण्याची योजना आखत आहेत. ते अमेरिका आणि स्पॉट बाजारातून कच्च्या तेलाची मागणी करण्याची तयारी करत आहे.

इंडियन ऑईल ने एप्रिल-मे मध्ये तेलाच्या खरेदी साठी पश्चिम आफ्रेका, मध्य पूर्व, अमेरिका आणि कॅनडा कडून कच्च्या तेलासाठी स्पॉट टेंडर मागवले आहे. सरकारी आकडेवारी नुसार जानेवारीत सौदी अरेबिया कडून कच्च्या तेलाची मागणी ३६ टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून कच्च्या तेलाची मागणी दुप्पटीने वाढली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्स च्या म्हणण्यानुसार, इंडियन ऑईल ने मे महिन्यात कच्च्या तेलाची खरीदी २५ टक्क्यांनी घटवण्याची योजना बनवली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार भारत ओपेक प्लस कडून ८६ टक्के तेल खरीदी करतो. यातील १९ टक्के तेल सौदी अरेबियाकडून खरेदी केले जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा