आज होणार भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा वनडे सामना

16

पुणे, १० डिसेंबर २०२२: भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज सकाळी ११.३० वाजल्यापासून चितगाव येथे खेळवला जाणार आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर मालिका गमावलेली टीम इंडिया तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध प्रथमच सलग ३ एकदिवसीय सामने जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.

दुखापतीमुळं बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडलेल्या रोहित शर्माच्या जागी लोकेश राहुल भारताचं नेतृत्व करेल. भारताचे दीपक चहर आणि कुलदीप सेनही दुखापतीमुळं तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडलेत. अशा स्थितीत भारत किमान ३ बदलांसह मैदानात उतरेल.

हवामान अहवाल काय सांगतो?

बांगलादेशात सध्या थंडीचं वातावरण आहे. शनिवारी शहरातील तापमान १७ ते २९ अंशांच्या दरम्यान राहील. सकाळी १० नंतर सूर्यप्रकाश येईल. रात्री ८ नंतर दव पडण्याची शक्यता आहे. पण, दोन्ही एकदिवसीय सामने रात्री ८.३० पर्यंत संपले होते. अशा परिस्थितीत दव फारसा प्रभाव पाडू शकणार नाही.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, नजमुल हसन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.

भारत: केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव/शहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा