आज भारत विरुद्ध हाँगकाँग महामुकाबला

अबू धाबी ३१ ऑगस्ट २०२२: सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला मात दिल्यानंतर आज भारत हाँगकाँगविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आशिया कप २०२२ स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल चांगलेच वाढले असून, सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत सुपर फोरमध्ये आपली जागा पक्की करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात.
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल हा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात मोठी खेळी करून आत्मविश्वास मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच विराट कोहली याच्याकडे देखील मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी आहे.

याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक याला देखील वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या गोलंदाजी विभागात देखील बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी असून, पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार, अर्शदीप व आवेश खान यांच्यावर सर्वांची नजर असेल.

युजवेंद्र चहल याला देखील आणखी एक संधी मिळेल. भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निजाकत म्हणाला की, “आमच्यासाठी हा खूप मोठा सामना आहे आणि आम्ही या सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. मागील काही सामन्यात आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळले आहे. आम्ही पात्रता फेरीतील सामन्यांमध्येच दाखवून दिले की, आम्ही मोठमोठ्या संघांनाही चांगलीच टक्कर देऊ शकतो. २०१८ मध्ये आम्ही भारताकडून फक्त २० धावांनी हरलो होतो. परंतु टी२० क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते.”

ग्रुप स्टेजमधील भारताचा हा अखेरचा सामना असून हा जिंकल्यास भारत पुढील फेरीत पोहोचणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा