दुबई २३ फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही १९ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. मात्र चाहत्यांना ज्या रोमांचक सामन्याची आतुरता असते असा सामना आज दुबई येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळवण्यात येणार असून या हाय व्होल्टेड सामन्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहेत.एकीकडे भारतीय संघाने बांग्लादेश संघाला हरवत या स्पर्धेतील आपला पहिला विजय आपल्या नावावर केला आहे तर दुसरीकडे यजमान पाकिस्तानला इंग्लंड संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
याचवेळी एक माहिती समोर येत आहे की, दबावात असलेल्या पाकिस्तान संघाला भारतीय संघ पाठिंबा देत आहे. याबबात माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी भारत- पाकिस्तान सामन्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आजच्या सामन्यात पाकिस्तान जिंकावा त्यांना असे वाटण्यामागे नेमक काय कारण आहे. हे देखील त्यांनी सांगितले आहे.


काय आहे कारण
ते म्हणाले, जर आज ( रविवारी) भारताने पाकिस्तान संघाला हरवले तर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना जिंकला तर स्पर्धेत अधिक रोमांच येईल असे अतुल वासन यांचे म्हणणे आहे. मला वाटते की आजचा सामना पाकिस्तान संघ जिंकावा ( मग मजा येईल) जर तुम्ही पाकिस्तान संघाला जिंकू दिल नाही, तर तुम्ही काय कराल ? पाकिस्तान आज जिंकला तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अजून चुरस वाढेल. असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वासन म्हणाले. वासन यांनी भारताकडून नऊ एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामने खेळले आहेत.
वेळ : दुपारी २.३० वा.
●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर