आज भारत-वेस्ट इंडिजमध्ये होणार लढत, तर दोन्ही संघ या प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रवेश

फ्लोरिडा, १२ ऑगस्ट २०२३ : आज शनिवार १२ ऑगस्ट रोजी WI vs IND टी-२० मालिकेतील चौथा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क, फ्लोरिडा वेस्ट इंडिजमध्ये रात्री ८ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियासाठी आजचा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आज जर वेस्ट इंडिज जिंकला तर भारतीय संघ मालिका गमावेल. कारण या मालिकेमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांपैकी, वेस्ट इंडिजने पहिले २ सामने जिंकले. आणि तिसरा सामना भारताने जिंकला.

या मालिकेतील ब्रायन लारा स्टेडियम, तारुबा त्रिनिदाद येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजने ४ धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजने २ गडी राखून विजय मिळवला.

मात्र, तिसरा सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १५९ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत १३ चेंडू बाकी असताना १७.५ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. सध्या ५ सामन्यांची ही मालिका २-१ अशी बरोबरीत आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन / इशान किशन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (wk), रोव्हमन पॉवेल (c), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा