भारत विरुद्ध झिम्बाब्वे 3 री वनडे आज, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पुणे, २२ ऑगस्ट २०२२: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतलेला भारतीय संघ आज पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध आतापर्यंत ६२ सामने खेळले असून ५४ सामने जिंकले आहेत.

त्याचबरोबर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध ६५ सामने खेळले असून ५३ सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने आज झिम्बाब्वेला हरवल्यास, भारत झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

भारताने पहिला सामना १० गडी राखून आणि दुसरा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले आणि हे लक्ष्य २५.४ षटकात 5 विकेट्स राखून पूर्ण केले.

टीम इंडियात युवकांना संधी मिळू शकते

मालिकेवर कब्जा केलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो. ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि राहुल त्रिपाठी यांना संधी मिळू शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज.

झिम्बाब्वे: तकुडवानाशे कैतानो, इनोसंट कैया, शॉन विल्यम्स, वेस्ली मधेवेरे, सिकंदर रझा, रेगिस चकाबवा (सी आणि wk), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्युची, तनाका चिवांगा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा