आज विश्वचषकात रंगणार भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना

पुणे, ६ नोव्हेंबर २०२२ : एकेकाळचा विश्वविजेता समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा आज नवख्या नेदरलँड संघाने धक्कादायकरित्या पराभव केलाय. त्यामुळं दक्षिण आफ्रिका या टूर्नामेंटमधून बाहेर पडलीय. आज दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानं टीम इंडियाला त्याचा फायदा होत भारतीय संघ ६ पॉईंट सह विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलाय.

भारतीय संघ आज उपांत्य फेरीत पोहचला असून भारतीय संघाला झिम्बाब्वे विरुद्धचा अखेर चा सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेला छोटा संघ म्हणून हलक्यात घेतल्यास भारताच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ७ टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेलेत. यामध्ये भारतीय संघाने सात पैकी पाच सामन्यांत विजय नोंदवला आहे. तर टी ट्वेंटी फॉरमॅट मध्ये दोन्ही संघानी शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता. त्यानंतर यंदाच्या टी ट्वेंटी विश्वचषकात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.

दरम्यान आजच्या सामन्यत पावसाचा अडथळा येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार मेलबर्न मध्ये आज पावसाची ४० टक्के शक्यता आहे. त्याचबरोबर हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा