आज विश्वचषकात भारत भिडणार द. आफ्रिकेशी

पुणे, ३० ऑक्टोबर २०२२ : टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान पाठोपाठ नेदरलँडचा पराभव केल्यानंतर भारताचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यास त्यांचा विश्वचषकाच्या सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग जवळपास निश्चित होणार आहे.

टीम इंडिया ने टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची दमदार सुरुवात करत पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना ४ गडी राखून जिंकला. त्यानंतर टीम इंडियाने नेदरलँड विरुद्धचा दुसरा सामना ५६ धावांनी जिंकला. आज दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिके नंतर पुन्हा एकदा भारता समोर येणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये केएल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन मध्ये भारतीय मॅनेजमेंट ऋषभ पंतला संधी देऊ शकते.

आजचा सामना हा पर्थ मध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होणार असून अर्ध्या तासा आधी दोन्ही संघात नाणेफेक केली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा