पुढील वर्षी भारत SCO शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार

समरकंद, १७ सप्टेंबर २०२२: भारत पुढील वर्षी २३ व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद भूषवणार आहे. त्याचे अध्यक्षपद शुक्रवारी उझबेकिस्तानमध्ये भारताकडे सोपवण्यात आले. उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री व्लादिमीर नोरोवी यांनी सांगितले की, पुढील वर्षासाठी एससीओचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहे.

त्यांनी माहिती दिली की, ‘पुढील SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी आम्ही भारताला सर्व प्रकारे पाठिंबा देऊ. सप्टेंबर २०२३ पर्यंत, म्हणजे संपूर्ण वर्षभर, भारत संस्थेचे अध्यक्षपद भूषवेल.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे यजमानपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. एएनआयशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले की, पुढील वर्षी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये पाकिस्तानची हिस्सेदारी असेल की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा