अग्नी सिरीज मधील सर्वात ॲडव्हान्स मिसाईल चे परीक्षण करणार भारत, ही आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली, २६ जून २०२१: देशात पुढील आठवड्यात अग्नि सीरीजचे सर्वात एडवांस वर्जन ‘अग्नि प्राइम’ ची चाचणी घेतली जाऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं (डीआरडीओ) हे मिसाईल विकसित केले आहे. अत्याधुनिक अग्नि प्राईम मिसाईल ला ४,००० किलोमीटर रेंज असलेल्या अग्नी ४ आणि ५,००० किलोमीटर रेंज असलेल्या अग्नि ५ मिसाईल मध्ये वापरल्या गेलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलं गेलंय.

मोबाईल लाँचरमधून देखील करता येईल लॉन्च

टू-स्टेज आणि सॉलिड फ्यूल वर आधारित अग्नि प्राइम मिसाईल ॲडव्हान्स रिंग-लेसर गायरोस्कोपच्या आधारे इंटर्शल नेव्हिगेशन सिस्टमद्वारे गाईड केले जाईल. दोन्ही टप्प्यात एकत्रित रॉकेट मोटर्स आहेत. त्याची गाईडिंग टेक्नॉलॉजी इलेक्ट्रोमेकॅनिकल अ‍ॅक्ट्युएटर्ससह सुसज्ज आहे. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगल स्टेज असलेल्या अग्नि -१ च्या विपरीत, डबल स्टेज अग्नि प्राइमला जमीन आणि मोबाईल लाँचरमधून सहजतेनं लॉन्च केलं जाऊ शकतं.

स्लीक डिझाइन, अधिक फायर पॉवर

एका अधिकाऱ्यानं मिसाईल शी संबंधित अधिक माहिती देण्यास नकार देत असं सांगितलं की, अग्नि प्राईम मिसाईल मध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर केल्या गेल्यामुळं मागील मिसाईल च्या तुलनेत कमी वजनाची शक्तिशाली मिसाईल तयार करण्यात आलीय. यामुळं या नवीन मिसाईल ची मारक क्षमता पहिल्यापेक्षा अधिक असेल.

१९८९ मध्ये झालं होतं अग्नि – १ चं परिक्षण

भारतात मे १९८९ मध्ये मिडीयम रेंज मधील बॅलेस्टिक मिसाईल अग्नि १ चं परीक्षण केलं गेलं होतं. त्यावेळी या मिसाइल ची मारक क्षमता ७०० ते ९०० किलोमीटर एवढी होती. ही मिसाईल २००४ मध्ये सैन्यात सामील करण्यात आली होती. जर अग्नी प्राईम ची यशस्वी चाचणी झाली तर अग्नी १ ची जागा नवीन मिसाईल घेईल. भारतनं अग्नी सिरीज मधील ५ मिसाइल बनवल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा