दुबई २१ फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगामाला सुरुवात झाली असून काल दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात या मालिकेचा दूसरा सामाना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.भारतीय संघाच्या विजयात उपकर्णधार शूबनम गिल आणि गोलंदाज मोहम्मद शमी यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.
बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यातच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बांगलादेश संघाच्या फलंदाजांच्या ५ विकेट्स ठिल्या उडवल्या. त्यांनी २२८ धावांचे लक्ष भारतीय संघासमोर ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शूबनम गिलने आक्रमक सुरुवात केली होती. दोघांमध्ये अवघ्या काही क्षणातच अर्धशतकाची भागीदारी झाली होती. पण कर्णधार रोहित शर्माला १० व्या षटकांत तस्किन अहमदने झेल बाद केले.रोहितने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यानंतर सलामीवीर शूबनमला विराट कोहलीने साथ दिली.
विराट कोहलीने सुरुवात धीम्या गतीने केली. पहिल्या १ धावसाठी त्याने १० चेंडू घेतले. पण काही वेळानंतर तो चांगल्या लयीत फलंदाजी करत होता.त्याच्याकडून चांगले धावा होतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही त्याने ३८ चेंडूत २२ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल लवकर बाद झाले. त्यामुळे सामना हळूहळू बांग्लादेश संघाच्या हातात चालला होता.एकीकडून सलामीवीर शूबनम गिल चांगल्या लयात होता. पुढे त्याला के.एल राहुलने साथ दिली. राहुलचा १० धावांवर असताना झेल सुटला तो बांग्लादेश संघाला महागात पडला.
के.एल राहुलने शूबनम गिलसोबत अर्धशकांची भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. त्याच्या भागीदारी दरम्यान गिलने त्याचे वनडेतले आठवे शतक पूर्ण केले. हे त्याचे आयसीसी स्पर्धेतील पहिले शतक ठरले. शूबनम गिलने १२९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकरांच्या मदतीने तब्बल १०१ धावा केल्या त्याच्या सोबत के.एल राहुलने ४७ चेंडूत ४१ धावांची नाबात खेळी केली.