तिरंदाजीमध्ये भारताला मिळाले २१वे सुवर्णपदक

पुणे, ५ ऑक्टोंबर २०२३ : भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. भारतीय तिरंदाजांनी गुरुवारी पुरुषांच्या सांघिक सामन्यात देशासाठी २१वे सुवर्णपदक जिंकले. अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि प्रथमेश जावकर यांनी तिरंदाजीत हे पदक जिंकण्यासाठी सहभाग घेतला. भारतीय संघाच्या खेळाडूंनी कोरियाविरुद्ध २३५-२३० असा विजय मिळवून भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

आत्तापर्यंत पाहिले तर भारतीय खेळाडूंनी एकूण ८४ पदके जिंकली आहेत. यामध्ये २१ सुवर्ण पदके, ३१ रौप्य पदके आणि ३२ कांस्य पदके यांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी भारतीय खेळाडूंनी कधीच इतकी पदके जिंकली नव्हती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा