१२ वर्षांनी भारताने कोरले चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव; न्यूझीलंडच स्वप्न भंगल

11
India won the Champions Trophy after 12 years by defeating New Zealand by 4 wickets.
भारताने न्यूझीलंड संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे.

IND Win Champions Trophy : दुबई येथे खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल १२ वर्षांनी टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकल्याने करोडो चाहते खुश झाले आहेत. एवढेच नव्हे तर आतापर्यंत भारताने तिसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली नाही. त्यांनी ७ षटकांत यंगच्या स्वरूपात आपली पहिली विकेट्स गमावली. याशिवाय किवी संघाकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तसेच मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५३ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

२५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात सुद्धा चांगली राहिली नाही. शूबनम गिल अवघ्या ३१ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा तुरा सांभाळला. त्याने ७६ धावांची शानदार खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले, तर के.एल राहुल ( नाबाद ३४) आणि अक्षर पटेलने २९ धावांची छोटीखानी पण महत्वाची खेळी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा