पुणे, १५ सप्टेंबर २०२३ : आशिया चषक सुपर ४ चा शेवटचा सामना सुरु झाला आहे. भारत आणि बांगलादेश संघ आमनेसामने आले असुन भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत भारत पोहचल्यामुळे या सामन्याचा निर्णय भारताच्या हिताचा असेल अशी माहिती आहे. या सामन्याचा दुसरा दावेदार श्रीलंका आहे.
बांगलादेशने आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर निश्चितच संघाचे मनोबल उंचावेल आणि भविष्यात ते अधिक चांगले खेळण्याची आशा करू शकतात. आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात १७ सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे.
आजच्या मॅचमधील टीम-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा.
बांगलादेश : शकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक,
नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदय, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख, शमीम होसेन, तनजीद हसन तमीम, तंजीम हसन साकिब.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड