फ्रान्स मधील भारतीय राजदूतांनी घेतली भारतीय वैमानिकांची भेट

फ्रान्स, २७ जुलै २०२० : बुधवारी भारतात पोहोचण्यासाठी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी काही तासांपूर्वी फ्रान्समधून बाहेर पडली असून ती बुधवारी भारतात दाखल होतील. भारतासाठी ही एक अभिमानाची बाब असून वायूसेनेच्या मुकुटात हा एक मानाचा तुरा म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

राफेलच्या येण्याने पाकिस्तान व चीनच्या मनात धडकी तर नक्कीच भरेल, पण त्याच बरोबर भारतीय सैन्याचे पण मनोबल वाढेल. २८ जुलैला हरियाणाच्या अंबाला येथे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल सामील होतील.

फ्रेंच विमानचालन कंपनी डेसॉल्ट यांनी निर्मित केलेल्या लढाऊ विमानांनी दक्षिणेस फ्रान्सच्या बोर्डोच्या मेरिनाक हवाई तळावरुन उड्डाण केले आहे. पण तत्पुर्वी या तळावर फ्रान्स मधील भारतीय राजदूत श्री जावेद अशरफ यांनी वायूसेनेच्या वैमानिकांशी संवाद साधून त्यांचे अभिनंद केले व राफेलच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा