पुणे, ३ मार्च २०२३ : दर शनिवारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. बँक कर्मचायांसाठी आयबीए पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यावर विचार करीत आहे. इंडियन बँक्स असोसिएशन पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करीत आहे, ज्यामध्ये शनिवारचा समावेश असेल. बँक संघटनांनी सादर केलेल्या या प्रस्तावामुळे वर्षभरातील बँकांच्या सुट्यांमध्ये वाढ होऊ शकते.
इंडियन बँक्स असोसिएशनद्वारे पुनरावलोकन केलेल्या प्रस्तावानुसार भारतीय बँका लवकरच प्रत्येक आठवड्यातील शनिवारसह पाच दिवस बंद ठेवल्या जाऊ शकतात. हे मंजूर झाल्यास, वर्षभरातील बँकेच्या सुट्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक संघटनांनी वर्षभरात पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शनिवार व रविवार सुटी मिळेल.
काही जण त्यांचे बँकिंग ऑनलाइन करण्यास प्राधान्य देत असले, तरी ज्यांना आठवड्याच्या शेवटी त्यांच्या बँक शाखांना भेट देण्याची गरज आहे त्यांच्यावर या प्रस्तावाचा परिणाम होऊ शकतो. सध्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात.
पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या प्रस्तावात, शनिवार आणि रविवार सुटीसह सोमवार ते शुक्रवार १० तासांच्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. वाढीव कामाच्या तासांच्या प्रस्तावाला आयबीएने अद्याप मंजुरी दिलेली नाही; परंतु असोसिएशनकडून त्यांना दुजोरा मिळू शकतो.
आयबीए सध्या युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईजसोबत पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा करीत आहे; परंतु हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही, हे सध्या स्पष्ट नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : केतकी कालेकर