भारतीय कफ सिरपनं नाही झाला ६६ मुलांचा मृत्यू? गांबिया सरकारनं घेतला यू-टर्न

पुणे, ३ नोव्हेंबर २०२२: अलीकडंच भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळं गांबियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झालाय. आता गांबिया सरकारनं या प्रकरणी यू-टर्न घेतलाय. भारतीय कफ सिरपमुळं किडनी खराब झाल्यानं सुमारे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. देशाच्या औषध नियंत्रण संस्थेच्या प्रतिनिधीनं रॉयटर्सला ही माहिती दिली.

गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, गांबियातील आरोग्य संचालक मुस्तफा बिट्टे यांनी सर्व मुलांच्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी केली आणि सांगितलं की या सर्व मुलांचा किडनीच्या गंभीर समस्येमुळं मृत्यू झाला.

सूत्रांचं म्हणणं आहे की भारतानं आपल्या देशात अशा सिरपला परवानगी देण्याबद्दल द गॅम्बियाच्या स्क्रीनिंग आणि ऑडिटच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितलं की, मृत्यू झालेल्या ६६ मुलांचा पीएम रिपोर्ट दाखवतो की त्यांना ई-कोलाय आणि डायरिया झाला होता, मग त्यांना कफ सिरप का दिलं जात होतं?

कफ सिरपमुळं मृत्यू – डब्ल्यूएचओ प्रमुख

डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ टेड्रोस यांनी जाहीर केलं की मेडेन फार्मास्युटिकल्सनं भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळं गांबियातील ६६ मुलांचा मृत्यू झालाय. डब्ल्यूएचओनं गेल्या महिन्यात सोनिपत येथे मेडेन फार्मास्युटिकल्सच्या चार उत्पादनांना प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफी बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप “अत्यंत वाईट वैद्यकीय उत्पादनं” म्हणून उद्धृत करून वैद्यकीय इशारा जारी केला.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी जारी केलं होतं की, ‘डब्ल्यूएचओने द गांबियामध्ये सापडलेल्या या चार दूषित औषधांबाबत वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केलाय, जे किडनीच्या गंभीर समस्यांशी संबंधित आहेत आणि येथील ६६ मुलांचा मृत्यू झालाय.’

एक अलर्ट जारी करताना, WHO ने सांगितलं की यापैकी फक्त चार उत्पादनं गाम्बियामध्ये आढळून आली आहेत, परंतु ही सर्व उत्पादनं इतर देश आणि प्रदेशांना अनौपचारिकरित्या वितरित केली गेली असावीत. अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओनं सर्व देशांना सुचवलं होते की या चार उत्पादनांचं वितरण थांबवावे जेणेकरुन लोकांचे प्राण वाचू शकतील.

भारतानं चौकशीसाठी एक स्थापन केली होती समिती

गांबियातील बालकांच्या मृत्यूचं प्रकरण गांभीर्याने घेत केंद्र सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. स्थायी राष्ट्रीय वैद्यकीय समितीचे उपाध्यक्ष डॉ. वायके गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना करण्यात आली.

तपास अहवाल येईपर्यंत कंपनीचं उत्पादन बंद करण्यात आलं होतौ. यानंतर १, ३, ६ आणि ११ ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणी हे सिरप तयार होत होतं, त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. तेथून नमुने गोळा करून चंदीगडच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा