पाटणा, ३ डिसेंबर २०२२ : बिहारची राजधानी पाटणा येथे दक्षता विभागाच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. भ्रष्ट कार्यकारी अभियंताला दक्षता विभागाने दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यासोबतच त्यांच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात त्यांच्या लपून बसलेल्या सुमारे २० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन लाख रूपयांची लाच घेताना मध्य विभागाच्या इमारत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीत कुमार यांना दक्षता ब्युरोने रंगेहात पकडले. या छापेमारीत दोन बॅगही सापडल्या आहेत. या दोन्ही बॅगमध्ये २००० आणि ५०० च्या नोटा ठेवल्या होत्या. त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.
दक्षता विभागाने सापळा रचून गार्डनीबाग येथील घरातून दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. भ्रष्ट अभियंत्याने कंत्राटदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितली होती, मात्र दोन लाख रुपयांत सौदा ठरला व्हिजिलन्स ब्युरोने पडताळणीनंतर संबंधित भ्रष्ट अभियंत्याला अटक केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.