मुंबई, २६ ऑक्टोबर २०२२ : जगात अमेरिकेपासून कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलियासह अनेक आफ्रिकन तसेच आशियाई देशांत भारतवंशीय नेते प्रतिष्ठित पदांवर आहेत. आता भारतवंशीय ऋषी सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. सुनक हे हुजूर पार्टीचे यंदाचे पंतप्रधानपदाचे तिसरे उमेदवार आहेत. ते पंतप्रधान झाल्यामुळे भारतात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
जगातील सात देशांत आता भारतवंशीय राष्ट्रप्रमुख आहेत. त्यातील ऋषी सुनक ब्रिटनचे तर इतर राष्ट्रप्रमुख पुढील प्रमाणे-
◾पोर्तुगाल : पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिया कोस्टा भारतवंशीय आहेत. त्यांचे वडील ओर्लांडो कवी होते. त्यांचे आजोबा गोव्यात पणजीत राहत होते.
◾मॉरिशस : पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ देखील भारतवंशीय. पूर्वज बिहारमध्ये राहत होते. वडील अनिरुद्ध मॉरिशसमधील मोठे प्रस्थ. *सिंगापूर : राष्ट्रपती हलीमा याकूब यांचे पूर्वज भारताचेे. वडीलही भारतीय होते. आई मल्याळी .
◾सुरीनाम: लॅटिन अमेरिकन देशाचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखीही भारतवंशीय आहेत. चान संतोखी अशीही त्यांची ओळख.
◾गयाना : कॅरेबियन देशाचे राष्ट्रपती इरफान अलींचे पूर्वज भारतीय आहेत. १९८० मध्ये त्यांचा जन्म गयाना कुटुंबात झाला होता.
◾सेशेल्स: राष्ट्रपती रामकलावनही भारतवंशीय आहेत. पूर्वज बिहारमध्ये वास्तव्याला होते.
ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक प्रकारच्या प्रतिभेला संधी मिळेल असे दिसते. डॉमिनिक रॉबला मोठी जबाबदारी देण्याचे सुनक यांनी संकेत दिले. जेरेमी हंट अर्थमंत्री असतील. मेल स्ट्राइड, जॉन ग्लेन यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर संरक्षणमंत्री वालेस, वीज मंत्री जॅकब रीज-मॉग यांना वगळले जाऊ शकते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे