भारतीय हॉकी संघाचा शानदार विजय, बांगलादेशचा १५-१ असा केला पराभव

पुणे, ३० ऑगस्ट २०२३ : आशियाई हॉकी विश्वचषक मध्ये भारताने बांगलादेशचा पहिल्या सामन्यात पराभव केला. भारतीय संघाने शानदार सामना खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळला आणि दणदणीत विजय मिळवला. मनिंदर सिंग आणि मोहम्मद राहिल यांच्या जुगलबंदीचा फटका बांगलादेश संघाला बसला. भारताने सुरुवातीपासूनच विरोधी संघावर वर्चस्व राखले. भारताने बांगलादेश संघाला १५-१ ने पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला. बांगलादेशच्या संघाने पहिला गोल केल्यानंतर भारताने सामन्याचे चित्र फिरवून परतीच्या दिशेने गोल केले.

या हॉकी सामन्यात भारतीय संघाच्या दोन स्टार खेळाडूंनी संपूर्ण खेळ फिरवला. मनिंदर आणि राहिलच्या जोडीने भारतासाठी विजय सोपा केला. सामन्यादरम्यान मनिंदरने १०व्या, १८व्या, २८व्या आणि ३०व्या मिनिटाला तर राहिलने १५व्या आणि २४व्या मिनिटाला गोल केले. सुखविंदर, गुरज्योत सिंग आणि पवन राजभर यांनी दोन वेळा तर मनदीप मोर आणि दीपसन तिर्की यांनी प्रत्येकी एक गोल केला.

भारतीय संघ येत्या बुधवारी दोन सामने खेळणार आहे. पहिला सामना ओमानविरुद्ध तर दुसरा पाकिस्तानविरुद्ध खेळला जाईल. गुरुवारी भारतीय संघ मलेशिया आणि जपानशी भिडणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा