अन्नपूर्णा पर्वतावरून बेपत्ता झालेली भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर आहे जीवंत

हिमाचल प्रदेश, १९ एप्रिल २०२३: नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतावरून बेपत्ता झालेली हिमाचल प्रदेशची गिर्यारोहक बलजीत कौर जिवंत आहे. जीपीएस उपकरणामुळे बलजीत कौर यांचे प्राण वाचले. पायोनियर अॅडव्हेंचरचे अध्यक्ष पासांग शेर्पा यांनी सांगितले की, हवाई शोध पथकाने बलजीत कौरचा शोध घेतला. बलजीत कौरला हेलिकॉप्टरमधून वाचवल्यानंतर तिला नेपाळमधील काठमांडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिर्यारोहक बलजीत आता सुखरूप आहे.

विशेष म्हणजे अन्नपूर्णा हे जगातील १० वे सर्वोच्च शिखर आहे आणि बलजीत कौरने ते ऑक्सिजनच्या आधाराशिवाय सर केले. ती शिबिरात परतत असताना बेपत्ता झाली होती. कैलास हेलिकॉप्टर सर्व्हिसचे पायलट क्लॉड मार्टिन यांनी हे बचाव कार्य केले. बलजीत कौर हयात असल्याची माहिती असताना तिच्यासोबत फारसा संपर्क झाला नाही. तसेच, बलजीतच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती नव्हती. मात्र टीमने बलजीतची सुखरूप सुटका केली.

सोलन जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती नव्हती. हिमाचलचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. पण बलजीत जिवंत आहे. हिमाचल प्रदेशात मंगळवारी तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर नेपाळी मीडियाने ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे. नेपाळी मीडियाने ही बातमी शेअर केली आणि सांगितले की बलजीत कौरची तिथून सुटका करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा