भारतीय नोटांनाही महागाईचा फटका

नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर २०२२: आपण दररोज नोटांच्या सहाय्यानं अनेक व्यवहार करतो. पण, या नोटा छापण्यासाठी किती खर्च (Printing Cost) येतो ते तुम्हाला माहिती आहे का? १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसाठी केंद्र सरकारला किती रुपये खर्च करावे लागत असतील? वाढत्या महागाईचा नोटांच्या छपाईवर परिणाम झाला असेल का? महागाईचा ह्या खर्चावर काही परिणाम झाला असेल का?

नोट मुद्रण लिमिटेडकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून नोटा छापल्या जातात. मागील वर्षापर्यंत FY२२ मध्ये १० रुपयांच्या नोटेसाठी १ रुपयांपेक्षा कमी म्हणजे ९५ पैसे खर्च येत होता .तर ५० रुपयांच्या नोटेसाठी १.१३ रुपये खर्च येतो. तर १०० रुपयाच्या नोटेसाठी १.७७ रुपये, २०० रुपयांच्या नोटेसाठी २.३७ रुपये खर्च तर ५०० रुपयांच्या नोटेसाठी २.२९ रुपयांचा खर्च येत होता. अर्थात हा खर्च सरकारच्या तिजोरीतूनच होत होता. या वर्षी मात्र आर्थिक वर्षात (FY22) नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला अधिकचा खर्च आला.

२० रुपयांच्या नोटेसाठी केवळ एक पैसा खर्च येतो. ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी खर्चात काहीच वाढ झाली नाही. परंतु ५० रुपयांच्या नोटेसाठी यंदा २३ टक्के खर्च वाढलाय. RBI ने नोटा छापण्यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २४ टक्क्यांपेक्षा अधिकची रक्कम खर्च केलीय. त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय.

केंद्र सरकारला नोटा खरेदीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागलीय. या आर्थिक वर्षात (FY22) केंद्र सरकारला ४९८४.८ कोटी रुपयांचा खर्च आला.गेल्या आर्थिक वर्षात नोटा छपाईसाठी ४०१२.०९ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

२०१७ मध्ये नोटबंदी दरम्यान केंद्रीय बँकेला मोठा खर्च आला होता. त्यावेळी आरबीआयला खर्च करण्यासाठी ७९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले होते. त्यापूर्वी नोटा छापण्यासाठी ३४२१ कोटी रुपये खर्च आला होता. नोटबंदीच्या काळात १३३% खर्च वाढला होता.:महागाईनं भारतीय नोटांनाही सोडलं नाही असं म्हणावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा