नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३ : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतात गुंतवणूक करू शकतात. एलन मस्क यांनी भारतीय व्यक्तीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. टेस्लाने नव्या सीएफओ म्हणजे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून भारतीय व्यक्तीची नियुक्ती केली आहे. विद्यमान जॅकरी किर्कहार्न यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला.
CFO (Chief Financial Officer) मुख्य वित्तीय अधिकारी पदी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची नियुक्ती टेस्लाने केली आहे. तनेजा यांनी दिल्ली विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीचं टेस्लाचे भारतात पहिलं ऑफिस पुण्यात सुरु केलं आहे. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला CFO पदाची जबाबदारी देणं हे भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने एलॉन मस्क यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
वैभव तनेजा हे ४५ वर्षांचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर २०१६ मध्ये सोलारसिटी ताब्यात घेतल्यानंतर ते टेस्लाच्या कंपनीमध्ये रुजू झाले. टेस्ला कंपनीने म्हटले आहे की, मुख्य लेखा अधिकारी म्हणून त्यांच्या प्राथमिक जबाबदारीव्यतिरिक्त त्यांनी कंपनीमध्ये ‘मास्टर ऑफ कॉईन’ ची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वैभव तनेजा टेस्लासोबत २०१६ पासून जोडलेले आहेत. ते आधी सोलरसिटी कॉर्पोरेशन कंपनीत फायनन्स आणि अकाउंटच काम सांभाळत होते. तसेच मार्च २०१६ मध्ये टेस्लाने कंपनी हातात घेतली. त्यानंतर वैभव तनेजा टेस्लाचे कर्मचारी झाले. २०१७ साली कंपनीने त्यांना प्रमोट करून असिस्टंट कॉर्पोरेटर कंट्रोलर बनवले. मे २०१८ मध्ये कॉर्पोरेटर कंट्रोलन झाले. मार्च २०१९ पासून वैभव तनेजा हे मुख्य अकाउंटिंग अधिकारी आहेत. यापूर्वी तनेजा प्राईस वॉटर हाऊस कुपर्सचे कर्मचारी होते
याआधी टेस्लाचे मुख्य आर्थिक अधिकारी जॅकरी किर्कहार्न यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर कंपनीने ४५ वर्षीय वैभव तनेजा यांना नवा सीएफओ बनवल्याची घोषणा केली. जॅकरी किर्कहार्न यांनी गेल्या चार वर्षांपासून टेस्लाच्या मास्टर ऑफ कॉईन आणि फायनान्स चीफ म्हणून काम पाहिले. किर्कहार्न यांचा टेस्लामधिल करिअर १३ वर्षांचे राहिले आहे. किर्कहार्न यांनी जाता जाता लिहिले की, टेसलामध्ये काम करणे एक वेगळा अनुभव आहे. कंपनीमध्ये मी जे काही काम केलं त्यावर मला गर्व आहे. येथील कर्मचाऱ्यांनी अशक्य असणारी कामं शक्य करून दाखवली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे