बॉलिवूडच्या ‘ या ‘ प्रसिद्ध गायकाच्या कारचा अपघात…

Hip-Hop Rapper Emiway Bantai Car Accident
Emiway Bantai NEW SONG Dubai Company

Hip-Hop Rapper Emiway Bantai Car Accident: भारतातील हिप-हॉपच्या दुनियेतील दिग्गज स्टार एमीवे बंटाई सध्या त्याच्या ‘दुबई कंपनी’ या नव्या म्युझिक व्हिडीओच्या शुटिंगसाठी दुबईतील शारजाह इथे आहे. त्याचा दुबईतील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एमीवे बंटाईनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हीलॉगचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टंट करताना दिसतोय, पण स्टंट करत असताना त्याचा अपघात होतो. आणि व्हिडीओमध्ये एमीवे पडताना दिसतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला आहे. त्याचवेळी कार अचानक जागेवर थांबते आणि बेसावध असलेला एमीवे बंटाई तोल गमावून चालत्या कारमधून बाहेर तोंडावर आपटतो. दरम्यान, हा अपघात जाणूनबुजून केलेला स्टंट होता की, चूक हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

एमीवेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, “हा खूप कठीण प्रसंग होता भावा, देवाचे आभार, तू सुरक्षित आहेस.” तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, “तू आमच्यासाठी खूप मेहनत करतोस, आता प्रेम दाखवण्याची आमची वेळ आहे…”

एमीवे बंटाई, ज्याचं खरं नाव मोहम्मद बिलाल शेख, त्यानं 2013 मध्ये ‘ग्लिंट लॉक’ या इंग्रजी रॅप गाण्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी हिंदीमध्ये रॅपिंग सुरू केलं आणि 2014 मध्ये आलेला ‘और बंटाई’ हा त्यांचा पहिला हिट ट्रॅक ठरला. तेव्हापासून एमीवेनं ‘मचेंगे’, ‘बंटाई’, ‘फिर से मचेंगे’ सारखी हिट गाणी दिलीत आणि भारतीय हिप-हॉपमधील सर्वात टॉप रॅपर्सच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी; पुनम सुपेकर