पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर, ३ जानेवारी २०२३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी (ता. तीन) २०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे (Indian Science Congress) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. ‘आरटीएमएनयू’च्या अमरावती मार्गावरील परिसरामध्‍ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. उद्घाटन सत्राला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि ‘आरटीएमएनयू’ शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश आहे; तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती आहे. यंदा विज्ञान काँग्रेसची संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या कार्यक्रमाला आज सकाळी अमरावती रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात आपले मनोगत मांडताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञानाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात; तसेच भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यात करीत आहे. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी सांगितले, की आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. या सायन्स काँग्रेसची संकल्पनासुद्धा समीकरण अशी आहे आणि संयोगाने या महिला काँग्रेसला लाभले आहेत असे ते म्हणाले. सध्या या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींनी संबोधित केले असून यावर्षीची संकल्पना ही महिला सक्षमीकरण व शाश्वत विकास असून महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या भागीदारीने त्यांना विज्ञानाच्या प्रगती सामील करणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितले आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता झाले असून या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवीत आहे.

‘भारतीय विज्ञान काँग्रेस’सोबत इतरही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. मुलांमध्ये वैज्ञानिक रुची आणि स्वभाव वाढविण्यासाठी चिल्ड्रन सायन्स काँग्रेसचेही आयोजन केले जाईल. शेतकरी विज्ञान काँग्रेस जैव-अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणार आहेत. आदिवासी विज्ञान काँग्रेस देखील आयोजित केली जाईल. जे आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच देशी प्राचीन ज्ञानप्रणाली आणि अभ्यासाचे वैज्ञानिक प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ असेल. काँग्रेसचे पहिले अधिवेशन १९१४ मध्ये आयोजित करण्यात आले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा