गोल पोस्ट स्पॉटलाइट कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकणार भारतीय सितारे

कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकणार भारतीय सितारे

मुंबई, १५ मे २०२३ : लुईस XV पीरियड ड्रामा “जीन डु बॅरी” च्या प्रीमियरसह ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात होत असताना कान्स रेड कार्पेट पुन्हा जिवंत झाले. प्रत्येक वर्षी रेड कार्पेटवर भारतीय तारे पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक असतो, यावर्षी कोण नव्याने पदार्पण करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. ऐश्वर्या राय बच्चन कान्समध्ये नियमित असते, या वर्षी रेड कार्पेटवर अदिती राव हैदरी, विजय वर्मा यांसारखे इतर अनेक सेलिब्रिटी दिसणार आहेत.

बॉलीवूड मधील अनेक सितारे त्यांच्या पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. अनुष्का शर्मा, ईशा गुप्ता, सारा अली खान, मानुषी छिल्लर या अभिनेत्री पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलचा रेड कार्पेटवर झळकणार आहेत. सारा आणि मानुषी काल रात्री फ्रेन्च रिव्हिएराला जाण्यासाठी निघालेल्या पाहायला मिळाल्या. मानुषी पांढर्‍या टँक टॉप आणि तपकिरी बूटांसह निळ्या फिट डेनिममध्ये दिसली. तिने एक साधा पण सुंदर पेहराव केला होता. तर साराने निळ्या डेनिमसह नेव्ही ब्लू जॅकेट आणि स्लिंग बॅगसह विमानतळावर जाताना दिसली.

सारा अली खान नुकत्याच एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. साराने काल विकी कौशलसोबत तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला, त्यानंतर ती विमानतळावर गेली आणि कान्सला रवाना झाली. हा तिचा नवीन प्रेम कथेवर आधारित चित्रपट २ जून रोजी रिलीज होणार आहे. तर मिस वर्ल्ड २०१७ चा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जिने सम्राट पृथ्वीराज या ऐतिहासिक नाटकातील संयोगिताच्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version