मेलबर्न, २५ डिसेंबर २०२०: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या कसोटीतील पहिला सामना भारताने गमावला. या कसोटीत पुन्हा आपली जागा मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यातील दुसरा सामना उद्या खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न मध्ये खेळला जाईल. दरम्यान उद्या खेळल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये रवींद्र जडेजा असणार की नाही? या सामन्यासाठी फायनल इलेव्हन टीम काय असेल? हनुमा बिहारी खेळणार का? की लोकेश, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
नुकतीच रविंद्र जडेजाची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. ज्यामध्ये तो खेळण्यासाठी फिट असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच टीम इंडियाच्या इलेव्हन टीम मध्ये तो सहभागी असेल. उद्या खेळल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, वृषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज असे खेळाडू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे सांगितले जात आहे की, फलंदाजीसाठी चार नंबर ला हनुमा विहारी येईल. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, चार नंबर ला के एल राहुल ला का स्थान देण्यात आले नाही. याचे कारण असे आहे की, यामागील दोन्ही दौऱ्यामध्ये हनुमा बिहारी चार नंबर ला खेळला होता. विराट कोहली नसला तरी हनुमा बिहारी चार नंबर ला खेळू शकेल असे टीम मॅनेजमेंट ला वाटत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे