भारतीय संघ परतला मायदेशी…..

नवी दिल्ली, २२ जानेवारी २०२१: भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौर्यावरून मायदेशी परतल आहे. संपूर्ण भारतीय हे खेळाडू परतल्याने देशभरात एक सण साजरा व्हावा तसे त्यांचे स्वागत आहेत. देशातील प्रत्येक राज्यात ऑस्ट्रेलियावर मिळावलेल्या विजयाचा जल्लोष पहायला मिळतोय. त्यात भारतीय संघाला या दौर्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले मात्र तरी भारतीय संघाने विजय खेचून आणला.

खेळाडू भारतात दाखल होताच सोशल मिडियावर संघातील प्रत्येक यंग खेळाडू कुठे कसा जातोय. तिथे त्यांचं स्वागत कसं होत आहे.याबद्दल जाणून घेण्यात मग्न झाले. तर विराट नंतर संघाची धुरा संभाळणारा अजिंक्य राहणेचं स्वागत ढोल ताशाचा गजरात करण्यात आले. त्याचा बिल्डिंग मधील सर्वांनीच त्याचे आपल्या  घरातील सदस्या प्रमाणेच स्वागत केले. तर घरच्यांना या विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

शार्दुल ठाकूर, टि नटराजन…

ऑस्ट्रेलिया कसोटी मधे प्रत्येक खेळाडूने आपलं सर्वस्व पणाला लावून क्रिकेट खेळले. तर २०१८ मधे शार्दुल ठाकूर दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपवून लोकल ने घरी परतला होता. त्यामुळे सर्व चाहत्यांचे लक्ष्य शार्दुल कडे लागले होते. कारण तो एकटा पालघर मधे राहणारा खेळाडू आहे.त्यांने एयरपोर्टवरून पालघरला न जाता थेट काकाच्या घरी गेला आणि तिथून तो पालघर ला गेला. तिथे त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. तर टि नटराजन ही जसा आपल्या घरी पोहचला तसा एखाद्या राजाचे स्वागत केले जाते तसे त्याचे स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतचा व्हीडीओ स्वताहा वीरेंद्र सेहवाग ने शेयर केला आहे.
मोहम्मद सिराज बरोबर भारतीयांच्या संवेदना…..

ऑस्ट्रेलिया दौरावर आसताना मोहम्मद सिराज च्या वडिलाचे निधन झाले होते. तरी सुद्धा त्याने घरी न जाता संघाबरोबर खेळण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतर तो मायदेशी आला आणि घरी न जाता वडीलांच्या कबरीला भेट दिली.त्याचा डोळ्यात अश्रू आले होते तर त्याने कबरीवर चादर चढवली होती. यावर सोशल मिडियावरून संपूर्ण देश मोहम्मद सिराज बरोबर असून संवेदना व्यक्त करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा